
मुख्यमंत्री फडणवीस संतापले; कडक कारवाईचा इशारा…
मुंबई : ही विधानपरिषद आहे याठिकणी दररोज हजारो अभ्यागत येत असतात. व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात अशा ठिकाणी असे वर्तन अयोग्य आहे.
हा सर्व परिसर विधानपिरषद सभापतींच्या अधिकारात आहे. त्यामुळे मी विधानसभा सभापतींना या हाणामारी करणाऱ्या सर्व लोकांवर कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे. व यासदर्भात मी सभापतींशी बोललो आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी दिली आहे.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होतात व मारामारी करतात हे लोकशाहीच्या मंदिरात शोभणारे नाही. हे कदापीही सहन करण्याजोगे नाही, योग्य नाही कडक कारवाई करावी असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.
याप्रकरणी सवस्तिर वृत्त असे की आज विधानपरिषदेच्या आवारात भाजपा आमदार गोपिचंद पडळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते समोरा समोर आले त्यांनी एकमेकांची गळपट्टी धरुन चांगलीच हाणामारी केली. या प्रकरणाचे पडसाद सर्व राज्यात पडले असून राजकीय वातावरण तंग झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी माध्यमांशी बोलताना वरील प्रतिक्रीया दिली आहे.
दरम्यान आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील जुना वादाचे पडसाद. विधान भवनातील लॉबीमध्ये उमटले. पडळकर- आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: मारामारी झाली. शिवीगाळ आणि मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली असून लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात अशा प्रकारची घटना घडल्याने सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.
गुरुवारी संध्याकाळी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीमध्ये आमनेसामने आले. आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. लॉबीत उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी हा वाद सोडवला. वाद नेमका कसा सुरू झाला, नेमकं काय घडलं हे अद्याप समजू शकलेले नाही.