
17 ते 21 जुलै दरम्यान पडणार धो-धो पाऊस; बघा जिल्ह्यांची यादी…
राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला असून विदर्भातील काही भागात उष्णतेत वाढ झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पारा 35 अंश डिग्री सेल्सीयसच्या पुढे गेल्याचे चित्र आहे.
परंतु हवामान विभागाचा आजचा अंदाज जर बघितला तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील धाराशिव तसेच लातूर, नांदेड त्यासोबतच विदर्भातील बुलढाणा,अकोला,अमरावती,वाशिम इत्यादी जिल्ह्यांमध्ये देखील आज पाऊस होईल अशी शक्यता आहे.
उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता चांगला पाऊस महाराष्ट्रात कधी येईल? हा देखील एक मोठा प्रश्न असून त्याचे उत्तर आपल्याला प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार सापडू शकते. चला तर मग पंजाबराव यांनी वर्तवलेला हवामान अंदाज नेमका कोणत्या पद्धतीचा आहे? हे आपण जाणून घेऊ.
पंजाबरावांचा ताजा हवामान अंदाज
याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज वर्तवला व त्यांनी म्हटले की, राज्यातील लातूर, नांदेड, परभणी, अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग, सोलापूर, धाराशिव, सांगली, हिंगोली आणि बीड या भागामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून चांगला पाऊस पडलेला नाही. परंतु आता 17 जुलै ते 21 जुलै या कालावधीत या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडणार असल्याचा महत्त्वपूर्ण आणि आनंददायी अंदाज यांनी वर्तवला. तसेच त्यांनी म्हटले की,या जिल्ह्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल व शेती पिके वाया जाणार नाहीत अशा स्वरूपाचा हा पाऊस असेल असे देखील त्यांनी सांगितले.
तसेच विदर्भाच्या बाबतीत त्यांनी सांगितले की पूर्व विदर्भात देखील 17 जुलैपासून 21 जुलैपर्यंत चंद्रपूर, नागपूर, वर्धा,भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, जळगाव जामोद, जालना इत्यादी जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकण विभाग तसेच नाशिक पट्ट्यात मात्र पावसाचा जोर आहे तसाच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
परत त्यांनी बोलताना म्हटले की,बीड तसेच परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव,सोलापूर, बार्शी,पंढरपूर,जत या भागात चांगला पाऊस अद्याप पर्यंत झालेला नव्हता. परंतु आता त्या ठिकाणी मात्र 21 जुलैपर्यंत चांगल्या स्वरूपाचा जोरदार पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे असा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी दिला. हा पाऊस कापूस तसेच सोयाबीन, ऊस तसेच इतर पिकांसाठी जीवदान देणारा ठरेल असा महत्वपूर्ण अंदाज त्यांनी वर्तवला. परंतु संपूर्ण राज्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितले की जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडू शकतो असं देखील त्यांनी म्हटले.