
दैनिक चालु वार्ता माजलगाव प्रतिनिधि -नाजेर कुरेशी.
माजलगाव शहरात नवीन वस्ती महेबुब नगर येथे विद्युत पोल टाकण्यात यावे. अशी मागणी
येथील नागरीक मागीत तीन वर्षापासुन करत आहे. तरी येथील या बाबीकडे म. रा.
वि. वि. कंपणीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
तरी या ठिकाणी लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथे
विज पुरवठा होत नसल्याने लोकांना आंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे आजुबाजूला
दाट वस्ती नसल्यामुळे रात्री साप, विंचु निघत आहे व यामुळे जिवीत हाणी होण्याची
दाट शक्यता आहे. शहरात चोरीचेही प्रमाण वाढल्यामुळे चोरी होण्याची दाट शक्यता
निर्माण झाली आहे. तरी यासर्व बाबीकडे आपण गांभीर्याने लक्ष देवुन तात्काळ आठ दिवसाच्या
आत विद्युत पोल टाकावे नसता येथील लोकांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर
तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे चालू वार्ताचे पत्रकार नाजेर कूरेशी यांनी उपकार्यकारी अभीयंता यांना निवेदनद्वारे असा इशारा दिला आहे.