
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
——————
तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची दि.१४ जुलै २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेली रचना रद्द करुन सन २०१२ व सन २०१७ प्रमाणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना कायम करण्याची मागणी कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी कंधार तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची दि.१४ जुलै २०२५ रोजी रचना जाहीर करण्यात आली होती. सदरील रचना ही चुकीची असून कुठल्याही नियमात न बसणारी आहे. यापूर्वी सन २०१२ व २०१७ प्रमाणे असलेली जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची रचना तोडून काही गावे इतर गटांमध्ये जोडण्यात आलेली आहेत. लोकसंख्या वाढ नसतांना व गटांची वाढ नसतांना नवीन रचना मतदारांच्या आणि गावकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीची आहे. नव्याने केलेली गटांची रचना संशयास्पद वाटत आहे.
त्यामुळे कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची जाहीर करण्यात आलेली रचना रद्द करुन सन २०१२ व सन २०१७ प्रमाणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना कायम करण्याची मागणी कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी कंधार तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.