
जावळीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची पेरणी झाली नसून विविध पिकांचे मोठ नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहून पंचनामे करून त्याचा अहवाल तातडीने द्यायच्या सुचना तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांना दिल्या.
जर एखाद्या शेतकऱ्यांने तक्रार केली तर संबंधित तलाठी, मंडलाधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सजड इशाराही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे दिला आहे.
मेढ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतक ऱ्यांनी त्यांना अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या. त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी तहसिलदार हणमंतराव कोळेकर ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, सागर धनावडेसमीर आतार, संदीप परामणे, मारूती चिकणे उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, राज्यात व जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अजून शासन स्तरावर ओला दुष्काळ संदर्भात कोणताही निर्णय झाला नसून काही ठिकाणी पावसाची उघडीप मिळाली आहे त्या ठिकाणी संबंधित विभागाचे तलाठी, सर्कल, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक यांनी स्वतः शेताच्या बांधावर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन त्याचा सर्वे करून अहवाल तयार करावा. याबाबत जिल्हाधिकारी यांना त्याबाबत सुचना केल्या आहेत.
महाबळेश्र्वर, वाई, जावली, पाटण, या विभागामध्ये तसेच जिल्ह्याच्या इतर भागा अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ नुकसान झाले असल्याने त्या विभागात महसुल व कृषी या दोन्ही विभागानी सहा दिवसात आपला नुकसानीचा अहवाल रिपोर्ट जिल्हाधिकारी यांना सादर करायचा आहे. म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत किंवा सततच्या पावसामुळे भाताची रोपे कुजून गेली तर काही ठिकाणी ऊस लागवड करण्यात आली नाही.
शेतीला वापसा न मिळाल्याने शेतीत कोणतच पीक घेता आली नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याच्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आतापासूनच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वे करायचा आहे. कुठे पंचायत समिती किंवा तलाठी ऑफीस, मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात बसून हा सर्वे करायचा नाही. तर काही ठिकाणी पेरण्या होवून सुद्धा दुबार पेरणीचे संकट आले आहे अशा ठिकाणी पण सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ना. भोसले यांनी दिले आहेत.
तात्काळ मदत करण्याच्या सुचना
अतिवृष्टीमुळे ज्या घरांची पडझड झालेली आहे त्या घरांच्या नुकसान भरपाईसाठी शासनस्तरावर संबंधित शेतकऱ्याला तात्काळ मदत करण्याच्या सुचना त्या त्या तालुक्यातील तहसिलदारांना केल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. जावळीत शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे . ही वस्तुस्थिती खरी असून पिकाची पैसेवारीही आता कमीच येईल. याबाबतही संबंधीत यंत्रणेने योग्यतेच मुल्यमापन करावे . नुकसानग्रस्त बाधित शेतकरी एकही वंचीत राहणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ना. भोसले यांनी सांगितले .