
संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरलं !
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली . ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना, पंतप्रधान हे संसदेत नव्हते या मुद्यावरूनही त्यांनी खडबोल सुनावले.
पाकिस्तानसोबत लढायचं नाही हे भाजप आणि त्यांच्या सरकारचा हा विचार स्पष्ट आहे, त्यांना अखंड भारत बनावयचा नाहीये आणि पीओके, जे पाकच्या कब्जात आहे, तोसुद्धा पुन्हा मिळवायचा विचार नाहीये. मग हे सरकार कशासाठी बसलं आहे ? असा खड़ा सवाल राऊतांनी विचारला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कोर्टमार्शल केलं पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले संजय राऊत ?
भारतीय संसदेचं महत्वं त्यांनी लोकशाहीतून, संविधानातून नष्ट करण्याचं ठरवलं आहे. ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना, पंतप्रधान हे संसदेत बसत नाहीत आणि विनोद असा की त्यांच्या एक्स पोस्टवर, समाजमाध्यमांवर ते राजनाथ सिंह, जयशंकर यांची भाषणं किती सुंदर झाली याचं वर्णन करतात. खरं म्हणजे विरोधी पक्षाचे नेते काल ऑपरेशन सिंदूरवर जे बोलले, त्याच्यावरही त्यांनी (पंतप्रधान मोदी) भाष्य करायला हवं होतं. प्रत्येकाने काल संसदेत जे मुद्दे मांडले, त्यावर पंतप्रधानांनी मत व्यक्त करायला हवं होतं.
मला आश्चर्य वाटतं की पंतप्रधानांच्या मनातलं काल बाहेर पडलं, देशाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं पाकिस्तानमध्ये घुसून , पीओकेवर कब्जा मिळवण्यांचं आमचं ध्येय कधीच नव्हतं. ही खूप गंभीर बाब आहे. भाजप वारंवार म्हणत होते, मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर आम्ही पीओके मध्ये जाऊ आणि भारताचा हिस्सा बनवू, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते, लोकसभेत अमित शाह म्हणाले होते की पीओकेसाठी आम्ही बलिदान देऊ. पण काल त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आमचा तो उद्देश नाही आणि त्या भाषणाचा पंतप्रधान हे गौरव करत आहेत. म्हणजे पाकिस्तानसोबत लढायचं नाही हे भाजप आणि त्यांच्या सरकारचा हा विचार स्पष्ट आहे, त्यांना अखंड भारत बनावयचा नाहीये आणि पीओके, जे पाकच्या कब्जात आहे, तोसुद्धा पुन्हा मिळवायचा विचार नाहीये. मग हे सरकार कशासाठी बसलं आहे ?
केंद्रीय गृहमंत्र्याचं कोर्टमार्शल करा
पठाणकोट असो की पहलगाम असो, या सरकारने ज्या प्रकारे आपल्या सैनिकी कारवाईचं राजकारण केलं आहे, त्यांचं कोर्ट मार्शलच झालं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव, ऑपरेशन गंगा.. हेच सगळं करत बसणार का ? सैनिकी कारवाीत हे लोकं वारंवार हिंदुत्व आणतात, धर्म आणतात, जात आणतात. हे सगळं मतांसाठी का, असा सवाल विचारत राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.