
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
————-
दिवा – गेली अनेक वर्ष दिवा शहरातील शासकीय हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेला भूखंड कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकदा या आरक्षित भूखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामा बाबत अनेक आमदारांनी अधिवेशनात आवाज उचलला तर अनेक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांनी यावर वेळोवेळी आवाज उचलला तरी देखील हा भूखंड भु-माफियांनी पालिका प्रशासन व राजकीय तंत्राचा वापर करून हळू हळू गिळंकृत केला असल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
मागील काही काळात मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाउंड, दोस्ती कंपाउंड सारख्या ठिकाणी अनेक ईमारती जमीनदोस्त करण्यात आल्या या नंतर अनेक नागरीक बेघर झाले. या घटने नंतर अनेकांनी दिवा प्रभाग समितीच्या प्रभाग क्रं.२७व२८ मधील सुरू असलेल्या कामांकडे लक्ष वेधण्याचे काम केले.
अखेर आज दिवा-आगासन रोड वरील शासकीय हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या ईमारतीच्या काही भागात ५ ट्रॅक्टर ब्रेकर, गॅस कटर, असंख्य पोलीस व सुरक्षा बाळाच्या साहाय्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागा मार्फत तोडक कारवाई करण्यात आली.