
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले परंतु या स्वतंत्रता आंदोलनाचा श्री गणेशा आष्टी येथून झाला ही वर्धा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून या स्वातंत्र्यासाठी आष्टीच्या सुपुत्रांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली हा इतिहास कधीही विसरून चालणार नाही असे प्रतिपादन वर्धा जिल्हा पालकमंत्री माननीय डॉ.पंकज भोयर यांनी केले. आष्टी येथे स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन स्फूर्तीतळ प्रांगणात करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद पुत्र डॉ. अरविंद मालपे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा पालकमंत्री डॉ पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोमन, सहकार महर्षी श्रीधर ठाकरे, भाऊसाहेब थुटे,
नगराध्यक्ष अनिल धोत्रे, स्वातंत्र्य सैनिक गुलाबराव वाघ यांचे नातू प्रदीप पाटील, हुतात्मा स्मारक समितीचे सचिव विनायक होले हे मंचावर उपस्थित होते. हुतात्म्यांचे स्मरण म्हणजे केवळ श्रद्धांजली नाही तर आपल्या कृतीतून त्यांच्या स्वप्नाचा भारत घडवण्याची जबाबदारीही आपण सर्वांची आहे असे मत आमदार सुमित वानखेडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.तर आपल्या अध्यक्षीय भाषणात शहीद पुत्र अरविंद मालपे यांनी आष्टीच्या स्वातंत्र्य संग्रामातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून स्फूर्तीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींनी शहीद स्मारकावर आणि स्फूर्तीस्थळावर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी वान्मथी सी, नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष भरत वणझारा यांनी, सूत्रसंचालन प्रा. कु.शितल चोरे व डॉ.मोहोड मॅडम यांनी तर आभार मुख्याध्यापक पी.जी.नाकतोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य, आष्टी तालुक्यातील नागरिकांसह , हुतात्मा स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ.किशोर गंजीवाले, कोषाध्यक्ष,राजाभाऊ सव्वालाखे, शंकरराव नागपुरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय उमरकर उपमुख्याध्यापक वीणा तांबस्कर ,पर्यवेक्षक सुनील ईखार व हुतात्मा शैक्षणिक परिवारातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रवंदनने करण्यात आला