
म्हणाले; शेतकऱ्यांनंतर आता खेळाडूंचीही उपेक्षा…
राज्यात कृषी खात्याचा वादात मंत्रीपद बदल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार सुरू आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून शायरीच्या शैलीत थेट सरकारवर आणि मंत्र्यांवर सडेतोड हल्ला चढवला आहे.कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर दानवे यांनी सरकारला फटकारले आणि शेतकरी असो वा खेळाडू, महायुती सरकार त्यांच्यावर अन्याय करते, असा आरोप केला.
दानवे यांचा काव्यात्म आरोप
विकूनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर…
नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर…
या ओळींमधून दानवे यांनी सत्ताधारी मंत्र्यांची कार्यपद्धती आणि कर्तव्यातील हलगर्जीपणा यावर उपरोधिक भाषेत ताशेरे ओढले आहेत.
शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा,
पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा..
यानुसार, कृषी खात्याची वाट लावून आता क्रीडा क्षेत्रालाही दुर्लक्षित केलं जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
डर कशाला कोणाचा; बॉस वर्षा बंगल्याबर बसलाय !
दानवे यांची ही ओळ सरकारमधील मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची आंधळी पाठराखण आहे, असा टोला आहे. यामध्ये मंत्र्यांच्या उर्मट वर्तनाला वर्षा बंगल्याची (मुख्यमंत्री निवास) पाठराखण मिळते, असा आरोप लपलेला आहे.
रम्मी मंत्री आता मैदानात नकोत !
वेडे-वाकडे बोलणे-वागणे टिकवी मंत्र्यांचा ‘ताज’,
आता नको मैदान, रम्मी खेळायला बसा महाराज..
या शेवटच्या ओळींमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर थेट हल्ला करत, ते राजकारणातील गंभीर विषयांऐवजी ‘रम्मी’तच व्यस्त राहतात, असा उपहासात्मक संदेश दानवे यांनी दिला आहे.अंबादास दानवे यांच्या या टीकेमुळे राज्यात सुरू असलेल्या खात्याबदलाच्या निर्णयावर अधिकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरकारने कोकाटेंना फक्त कृषी खाते काढून दुसरे खाते दिले, हे म्हणजे पुन्हा एकदा बक्षीस असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय.
दुसरीकडे, खेळाडू आणि क्रीडा संघटनांमध्येही नवीन मंत्र्यांबद्दल शंका आणि अस्वस्थता आहे. कोकाटे यांच्या आधीपासून वादग्रस्त कारभारामुळे, क्रीडा खात्याचा दर्जाही घसरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.अंबादास दानवे यांच्या टीकेतून सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा, मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनाची चिरफाड, आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे “मूक समर्थन” या मुद्द्यांवर टोकदार भाष्य झाले आहे.राजकीय असंतोषाचा तिढा वाढत चालला असून, “मंत्रीपद म्हणजे जबाबदारी की फक्त सत्तेचा खेळ?” असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे. आगामी काळात यावर सरकारची भूमिका काय राहते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.