
*चिंचोली येथे भाजपा शाखेचे उद्घाटन; असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव,भूम(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे चिंचोली येथे भारतीय जनता पक्षाच्या नव्या शाखेचे उद्घाटन व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा वार रविवार, दि.३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्य परिषदेचे सदस्य तथा विधानसभा प्रमुख मा.बाळासाहेब क्षीरसागर व भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत पातळीवर विविध पक्षांमध्ये सक्रिय असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षवाढीसाठी काम करण्याची ग्वाही दिली.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस रघुनाथ वाघमोडे, बिभीषण पवार, आबासाहेब मस्कर, अ.जा. मोर्चा तालुकाध्यक्ष दिनकर कांबळे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, भटके विमुक्त तालुकाध्यक्ष शिवाजी उगलमुगले, चिटणीस नीलेश शेळके, कामगार मोर्चा अध्यक्ष महादेव शेंडगे, शहर उपाध्यक्ष श्रीपाद देशमुख, ओबीसी मोर्चा अध्यक्ष शुभम खामकर, तसेच युवा नेते सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, सुबराव शिंदे, अमोल लोंढे यांचा समावेश होता.
नूतन शाखेसाठी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष बाबुराव साळुंखे, उपाध्यक्ष मारुती वारे, सचिव रणजित वारे, कोषाध्यक्ष नवनाथ शिर्के, तसेच सदस्य म्हणून शरद पवार, नवनाथ पवार, भीमा वारे, शेषेराव साळुंखे, भरत पवार, महादेव वारे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमानंतर तालुक्यातील इतर गावांमध्येही भाजपा शाखा स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे तालुकाध्यक्ष सुपेकर यांनी सांगितले. चिंचोली गावाने भाजपच्या विचारधारेशी एकवटून राजकीय स्थैर्याचा मार्ग स्वीकारल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.