
गरीबांच्या डॉक्टरचं निधन; मुख्यमंत्री म्हणाले…
केरळमधून एक दुखद बातमी पुढे येतंय. केरळमधील कन्नूर येथील “दोन रुपयांचे डॉक्टर” यांचे निधन झालंय. त्यांनी आयुष्यभर रूग्णांवर फक्त दोन रूपयांमध्ये उपचार केले. दोन रूपये त्यांची फिस असतं.
होतकरू आणि गरीब रूग्णांना ते फ्रीमध्ये गोळ्या देखील देत. डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे शनिवारी केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी त्यांच्य घराबाहेर गर्दी केली. डॉ. ए.के रायारू गोपाल हे 80 वर्षांचे होते आणि त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
विशेष म्हणजे त्यांचे दोन रूपये फिस असणारे रूग्णालय हे 2024 पर्यंत सुरू होते. त्यानंतर तब्येतीमुळे रूग्णालय बंद केले. निःस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडत त्यांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. कन्नूर येथील त्यांच्या निवासस्थानी एक छोटेसे क्लिनिक ते चालवत होते. विशेष म्हणजे ते मागच्या पाच दशकांपासून गरीब लोकांना सेवा देण्याचे काम करत होते. डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे नाव लोकांनीच दोन रुपयांचे डॉक्टर असे ठेवले होते.
डॉ. ए.के रायारू गोपाल यांच्या रूग्णालयाची खास गोष्ट म्हणजे सकाळी 4 वाजताच हे रूग्णालय सुरू होत. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत सुरू असायचे. डॉ. गोपाल हे दिवसभरात 300 पेक्षाही अधिक रूग्णांची तपासणी करत. ज्या लोकांकडे आैषधे घेण्यासाठी पैसे नसत त्यांना ते फ्रीमध्येच आैषधे देऊन घरी पाठवत. आजारी असल्यास शालेय मुले त्यांच्याकडे दाखवून मग शाळेत जात होती.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांचे वर्णन लोकांचे डॉक्टर असे केले आणि म्हटले की, इतक्या कमी शुल्कात सेवा देण्याची त्यांची तयारी गरीब रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी होती. डॉ. गोपाल यांच्या निधनाची बातमी कळताच लोक त्यांच्या घरी मोठ्या संख्येने पोहोचले होते. डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर मोठा आधार गेल्याची भावना लोकांमध्ये आहे.