
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
ठाणे, दि. ४ ऑगस्ट (जिमाका):
खरीप हंगाम 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत कोकण विभागातील ८८,१९४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विमा सहभागाची मुदत वाढवण्यात आली आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी: १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत
कर्जदार शेतकऱ्यांसाठी: ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत
विमा संरक्षण लाभ – पेरणीपासून काढणीपर्यंत
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन विमा संरक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागतो. कोकणातील भात, नाचणी आणि उडिद पिकांसाठी विमा रक्कम आणि हप्ता पुढीलप्रमाणे:
जिल्हा पीक विमा रक्कम (₹/हेक्टर) विमा हप्ता (₹/हेक्टर)
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भात ₹61,000 ₹457.50
ठाणे, पालघर, रत्नागिरी नाचणी ₹35,000 ₹87.50
रायगड, सिंधुदुर्ग नाचणी ₹40,000 ₹100
पालघर उडिद ₹25,000 ₹62.50
🧾 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (बिगर कर्जदार):7/12 उतारा आधार कार्ड पेरणी घोषणापत्र बँक खाते तपशील
अर्ज भरण्याची पद्धत:
शेतकऱ्यांनी AgriStack पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळवावा.
e-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी बंधनकारक आहे.
अर्ज CSC केंद्रांमार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.
शासनाच्या अधिकृत वेबसाईट व विमा कंपनीच्या पोर्टलवरून वैयक्तिकरीत्या अर्ज करता येतो.
या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक सहभाग घेता येतो.
📞 अधिक माहितीसाठी:
आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आर्थिक संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी ताटे, विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांनी केले आहे.