
विधानसभेला १६० जागांची ‘त्या’ दोघांनी गॅरेंटी दिलेली !
विधानसभा निवडणुकीआधी ‘त्या’ दोन व्यक्तींनी १६० जागांची हमी दिली होती.
राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची भेट घडवून आणली गेली.
शरद पवार यांनी यात पडू नये असा निर्णय घेतला.
या घटनेचा मोठा राजकीय गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.
विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती. त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली होती. त्यावेळी यामध्ये आपण पडायला नको, असे आम्ही ठरवलं, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर आता शरद पवार यांनी हा गौप्य स्फोट केला आहे. शरद पवार यांच्या गोप्यस्फोटानंतर ती दोन माणसं कोण होती? याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची युती आणि राहुल गांधींच्या आरोपावर भाष्य केले. राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेणारे आहेत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मीही उपस्थित होतो. राहुल गांधींच्या आरोपाला आयोगाने उत्तर द्यावे, असे यावेळी शरद पवार म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर बोलताना पवार म्हणाले की यावर आता ठोस बोलताना येणार नाही, आम्ही चर्चा करू
पुण्याला 3 नव्या महापालिकेची गरज का? वाचा पुणेकरांना याचा काय फायदा होणारजितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गटदोन व्यक्ती पवार साहेब यांच्याकडे आल्या होत्या, १६० जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितले होतं. मतदार यादीत धांदलीसाठी ते दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आल्या होत्या. पवारानी त्यांना दाद दिली नाही, असे होऊ शकत नाही असे सांगितले. महाराष्ट्रात ७६ लाख मतदार वाढले, शेवटच्या टप्प्यात अनेक टक्के मतदान वाढली. यावर मी सुरुवातीपासून बोलत होतो. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही.अनोखं रक्षाबंधन! एकुलत्या एक बहिणीचं निधन, मृत्यूनंतरही त्या हाताने बांधली राखी, भाऊ-बहिणीची हृदयस्पर्शी कहाणी
आम्ही लोकांनी लक्ष दिलं नाही, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन माणंस माझ्याकड आली होती. महाराष्ट्रामध्ये २८८ जागा आहेत, त्यांनी १६० जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल शंका येत आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. मी तिथं होतो, ज्यावेळी प्रेझेंटेशन बघत होतो, यावेळी उद्धव ठाकरे सोबत होते. एक गावात, घरात एक व्यक्ती राहत असताना 40 लोकांनी मतदान केले असे अनेक उदाहरण आहेत. निवडणूक आयोगाने लक्ष स्वतंत्र संस्था आहे, यात सखोल जाण्याची गरज आहे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.