
अमेरिकेनंतर ‘या’ देशाने दिला झटका; थेट आता !
भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून संबंध ताणले गेले असतानाच आता अजून एका दुसऱ्या देशाने भारताला मोठा धक्का दिलाय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ शुल्क आकारले आहे आणि याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
भारत अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चिंतेत असतानाच आता अजून एका दुसऱ्या देशाने धक्का दिल्याचे बघायला मिळतंय. ब्रिटिश सरकारने भारताच समावेश अशा देशांच्या यादीत केलाय, ज्यांचे नागरिक आधी हद्दपार आणि नंतर कोर्टात अपील करण्याचे धोरण आहे.
ब्रिटिश सरकारने त्या 15 देशांच्या यादीमध्ये भारताच्या नावाचाही समावेश केलाय. या धोरणांतर्गत भारतीय नागरिक ब्रिटनमध्ये गुन्ह्यांमध्ये आढळल्यास त्यांना आधी हद्दपार केले जाईल, त्यानंतर त्यांच्या अपिलावर सुनावणी होईल. हा भारताला खरोखरच मोठा धक्का म्हणावा लागेल. ब्रिटिश सरकारने हे स्पष्ट केले की, त्यांचा यामध्ये उद्देश फक्त इतकाच आहे की, जेलमधील गर्दी ही कमी व्हावी. मागील काही वर्षांपासून ब्रिटनमधील गुन्हेगारी वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लोकांनी गुन्हे करताना चार वेळा विचार करावा. आता या नियमानुसार एखादा व्यक्ती दोषी आढळला की, त्याला लगेचच ब्रिटिनमध्ये हद्दपार केले जाईल. गुन्हात दोषी आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीला हद्दपार सर्वात अगोदर केले जाईल आणि सुनावणीदरम्यान भारतातून व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून त्याला उपस्थित राहवे लागेल. मागील काही दिवसांपासून अवैध ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर कारवाई केली जात आहे.
ब्रिटन देशात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास आहे. मात्र, आता ब्रिटिश सरकारने थेट भारताचा समावेश पंधरा देशांच्या यादीत केलाय. ज्यामध्ये गुन्हात दोषी आढळलेल्या व्यक्तीला सर्वात अगोदर त्यांच्या देशातून हद्दपार केले जाते. मुळात म्हणजे अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या प्रश्नामुळे भारत चिंतेत असताना भारतावर अशाप्रकारची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. ब्रिटनला मिनी इंडिया म्हटले जाते. तिथे भारतीय लोकांचे मोठ्या संख्येत व्यवसाय आहेत. यासोबत नोकरीसाठीही भारतीय लोक तिथे मोठ्या संख्येने जातात.