
जावयाचं नात पवित्र मानलं जातं. आई-मुलासारखं हे नातं असतं. सासू जावयाचे लाड, हट्ट पुरवते. प्रसंगी काही मार्गदर्शक सल्ले देते. सासू-जावयाच्या नात्यात परस्पराबद्दल सन्मान, आदराची भावना असते.
पण कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे सासू-जावयाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. या घटनेने कोरतगेरेमध्य सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जावई सासू सोबत असं कसं वागू शकतो? असं कसं करु शकतो? हाच अनेकांच्या मनात प्रश्न आहे. रस्त्याच्याकडेला एक प्लास्टिक बॅग पडलेली. त्यात मानवी शरीराचे तुकडे सापडल्याने लोक घाबरले. पोलीस तपासातून खुलासा झाला की, तो 42 वर्षांच्या लक्ष्मी देवींचा मृतदेह होता. अत्यंत निदर्यतने लक्ष्मी देवीची हत्या करण्यात आली.
7 ऑगस्टच्या सकाळी कोलाला गावाजवळ काही लोक रस्त्यावरुन चालले होते. तिथे एक प्लास्टिक बॅग पडल्याचं त्यांच्या नजरेस आलं. संशय आला म्हणून त्यांनी बॅग उघडली. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. बॅगमध्ये मानवी शरीराचे तुकडे होते. तात्काळ पोलिसांना या बद्दल कळवण्यात आलं. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आसपास शोध घेतला. पुढच्या दिवशी आणखी अशा सात बॅग सापडल्या. त्यात मानवी शरीराचे भाग आणि महिलेचं शीर मिळालं.
हे ऐकून गावातील लोक सून्न झाले
महिलेच जे शीर होतं, त्या आधारावर पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. तिचं नाव लक्ष्मी देवी असल्याचं समोर आलं. तपासात समोर आलं की, फक्त तिची हत्या केलेली नाही, तर मृतदेहाचे 19 तुकडे केलेत. हे ऐकून गावातील लोक सून्न झाले. या खळबळजनक हत्यांकाडाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक के. वी यांनी एक विशेष टीम बनवली. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. लक्ष्मी देवीचा जावई डॉ. रामचंद्रप्पा एस आणि त्याचे दोन साथीदार सतीश के. एन. आणि किरण के यांना अरेस्ट केलं. तिघेही तुमकुरुचे राहणारे आहेत.
हत्या का केली ?
पोलीस चौकशीत मोठा खुलासा झाला. आरोपी आणि मृत महिलेचा जावई रामचंद्रप्पाला आपल्या सासूच्या चारित्र्यावर संशय होता. लक्ष्मी देवीच्या कृत्यांमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय असं जावयाचं मत होतं. हाच संशय आणि रागापोटी रामचंद्रप्पाने मित्रांसोबत मिळून सासूच्या हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन ते वेगवेगळ्या बॅगेत भरले. पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.