
दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनिधी -गजानन देवणे
शिराढोण येथे “ऑपरेशन सिंदूर” मधील विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतात जवानांचे मनोधैर्य आणखी वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी, ध्वजारोहण करून तिरंगा रॅली काढून जय जवान, जय किसान,भारत माता की जय,आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. भारत सरकारने सैन्य दल व जवानांच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले हा संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे असे मत भाजपचे कंधार तालुका मंडळ अध्यक्ष तथा मा.सभापती बालाजीराव पांडागळे यांनी व्यक्त केले.
यावेळी रॅलीमध्ये कंधार भाजपा तालुका अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, व्यंकटराव पांडागळे मालिपाटील ,सरपंच खुशालराव पांडागळे, भाजप चे जेष्ठ नेते तुकाराम वारकड गुरुजी,मा. उपसरपंच साईनाथ पाटील कपाळे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे, ऍड. देवराव पांडागळे,माजी सैनिक किशनराव कपाळे, प्रल्हाद पाटील कपाळे, सचिन भुरे, संतोष चेन्नगे, राजाराम पांडागळे, राजू केते, गंगाधर पांडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम पांडागळे, प्रकाश चौडम, सदाशिव भुरे, शिवाजी गायकवाड पत्रकार शुभम डांगे, संतोष कराळे, शिवकांत डांगे, गजानन देवणे, दौलत पांडागळे सह माजी सैनिका सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
त्यांचबरोबर युवा मिल्ट्री अकॅडमी काकांडी चे विद्यार्थी,शिराढोण येथील भीमाशंकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, शंकर पाटील प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लॉर्ड वेंकटेश्वरा इंग्लिश स्कूल, किड्स क्लब पब्लिक इंग्लिश स्कूल आदी शाळेतील विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.