
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -किशन वडारे
————————————————
तालुक्यातील महाळंग्रा येथील जनता विद्यालयात
१९९५-९६ च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींने शाळेच्या संपूर्ण परिसरात वृक्षारोपण केले.
३० वर्षानंतर झालेल्या या स्नेह मेळाव्यात अनेक जुन्या आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा देण्यात आला.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी जनता विद्यालयाने दिलेले संस्कार आम्ही जीवनभर विसरू शकत नाही. गुरुंनी दिलेली शिस्त, चिकाटी, सचोटी यामुळेच आम्ही जीवनात घडलो अशी कृतज्ञता व्यक्त करत स्नेह मेळावा पार पडला.
या विद्यालयाने हा कार्यक्रम घडवून आणल्यामुळे एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या असून यातून विचारांची आदान प्रदान झाली, या स्नेह मेळाव्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा उपस्थित गुरुजनांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी विद्यार्थी राजकुमार आचार्य यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
या स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नागनाथ मोगले, विलास शिंदे, नामदेव गुरमे, बजरंग गंगाबोने, अफजल शेख, मछिंद्र गवळी, गणेश बस्तापुरे,महादेव कदम, शंकर पांचाळ आदिसह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनीने परिश्रम घेतले.