
भारत-पाकिस्तानबद्दल मोठा दावा; नरेंद्र मोदींना झटका…
टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसरा दावा केलाय. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ कर लादून अमेरिकेने मोठा धक्का दिला. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या विरोधात कडक भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घेतली जात आहे आणि भारतावर टॅरिफ लावणे त्याचाच एक भाग आहे.
भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. मात्र, पाकिस्तानच्या आडून थेट भारताला धमक्या देण्याचे काम हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात आहे. आता त्यांनी परत एकदा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबद्दल मोठे विधान केले.
डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक झाली. ही बैठक तब्बल तीन तास सुरू होती आणि पुतिन हे बैठकीसाठी अमेरिकेत पोहोचले होते. आता या बैठकीनंतर परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेले युद्ध मी थांबवले आहे. दोन्ही देश एकमेकांचे विमान पाडत होते. सर्वात महत्वाचे लोकांचे प्राण आहेत आणि मी या युद्धात ते वाचवण्यासाठी काम केले. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, हे युद्ध थांबवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तेक्षप नाहीये. दोन्ही सैन्य दलातील अधिकाऱ्यांची चर्चा करून करार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान एकमेकांची विमाने पाडत होती आणि बॉम्ब टाकत होती. स्थिती थेट परमाणू हल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. पण मी याला रोखू शकलो. सर्वात पहिले लोकांची जीव वाचवणे आहे आणि त्यानंतर सर्वकाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी आतापर्यंत सहा मोठी युद्ध थांबवली आहेत आणि त्यापैकी भारत पाकिस्तान एक आहे.
भारताकडून नेहमीच स्पष्ट करण्यात आले की, पाकिस्तान आणि आमच्यामधील युद्ध थांबवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांची कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती. विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत याबद्दल बोलताना म्हटले की, मी स्पष्ट करतो की, याबद्दल कोणत्याही प्रकारचा संवाद अमेरिकेसोबत झाला नव्हता. हेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यादरम्यान युद्ध स्थित निर्माण झाली होती.