
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनीधी –
पुणे : ( कोथरूड ) –
“कोथरूड विधानसभा अर्बन सेलच्या वतीने आयोजित मास्क व हँडग्लोज वाटप कार्यक्रम प्रसंगी मान्यवर उपस्थित.”
“आपल्या शहराची खरी स्वच्छता राखणारे योद्धे म्हणजे सफाई कर्मचारी. त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे समाजाचे कर्तव्य आहे,” या भावनेतून कोथरूड विधानसभा अर्बन सेल च्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क व हँडग्लोज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी पुणे शहर अर्बन सेलचे अध्यक्ष श्री स्वप्निल दादा दुधाने यांनी सांगितले की,
“स्वच्छता कर्मचाऱ्यांवर शहराची स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी असते. मात्र, ते आपल्या कर्तव्यादरम्यान अनेकदा धोकादायक पदार्थांच्या व रोगजनकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत हातमोजे व मास्कसारखी मूलभूत संरक्षणात्मक साधने उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या सुरक्षिततेस मोठा हातभार लागतो.”
या उपक्रमाचे आयोजन कोथरूड विधानसभा अध्यक्ष श्री सचिन यादव व सौ दीपालीताई डोख यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
यावेळी त्यांनी सांगितले की, “सफाई कर्मचारी हा समाजाचा कणा आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे संपूर्ण समाजाचे आरोग्य जपणे होय. त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक बांधिलकी मानून आम्ही तो राबविला.”
कार्यक्रमाला सौ प्रियंकाताई तांबे, सौ संगीताताई लिंबोळे, श्री संजयभाऊ खोपडे, श्री शिवाजीकाका गवारे, श्री संतोषभाऊ डोख, श्री तानाजीभाऊ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा सामाजिक जाणीव जागविणाऱ्या कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.