
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
ठाणे, दि.२१ (जिमाका):
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी “एक मेसेज व्हॉट्सॲपचा… तुमच्या समाधानाचा…” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करून नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे पाऊल उचलले आहे.
यासाठी ९९३०००११८५ हा विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक आपल्या तक्रारी या क्रमांकावर नोंदवू शकतात.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या तक्रार निवारण उपक्रमाचे अनावरण उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.