
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा !
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. मुंबईत 29 ऑगस्टला ते आंदोलन करणार आहेत. दरम्यान, रविवारी (ता.24) त्यांनी बीडमध्ये सभा घेतली.
या सभेनंतर माध्यमांशी बोलताना ‘आम्ही जे म्हणत होतो की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसाहेबांना काम करू देत नाही हे आता सिद्ध झालंय, असा दावा केला.’
जरांगे पाटील म्हणाले, आम्ही म्हटलो होतो की फडणवीस शिंदेसाहेबांना काम करू देत नाही. त्यावेळी फडणवीसांनी म्हटलं होतं की शिंदेंना विचारा मी काम करू देतो की नाही ते. पण असं कोणी सांगतं का? काम करू देत नाही, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.
‘ते (फडणवीस) येऊन आठ महिने झाले आहेत. तरी देखील ते आरक्षण देत नाही. याचा अर्थ त्यांनी त्यावेळी शिंदेसाहेबाला काम करू दिलं नाही, अजितदादाला आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले.
…तर मंत्रालयावर गुलाल उधळू
बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी येतोय. तुम्ही म्हणताय पोलिस बघून घेतील. पण कधीकधी सत्तापालट देखील होत असते. तु्म्ही आरक्षण दिलं तर मुंबईला येण्यावेळी वेळ येणार नाही आम्ही इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळू, असे म्हणत जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही मुंबईला येणार काय करायचं ते करा, असा इशारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटील यांनी दिला.