
7 ते 8 महिलांनी घेतली पोलिसात धाव; संबंध ठेवतानाचे व्हिडिओ…
पुणे पोलिसांनी खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता.
या रेव्ह पार्टीनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप ही केली जात आहेत. खेवलकरच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडली आहेत. पती प्रांजल खेवलकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर रोहिणी खडसे या पतीला वाचवण्यासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले.
आता एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या संपर्कात 7 ते 8 महिला असल्याची माहिती मिळतंय. या महिलांचे प्रांजल खेवलकरने संबंध ठेवताना, सहमती नसताना, चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केले असल्याचा आरोप केला आहे. त्याचं बरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळाली आहेत.
आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटोज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी 7 ते 8 महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती मिळतंय. सदर महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आता हे स्पष्ट आहे की, प्रांजल खेवलकरच्या अडचणी कमी व्हायच्या सोडून वाढणार आहेत. यावर अजून रोहिणी खडसे यांनी काही भाष्य केले नाहीये. रोहिणी खडसे यावर काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. त्यानंतर या पार्टीतील काही व्हिडीओही पुढे आली. हेच नाही तर अशाप्रकारच्या पार्टीमध्ये मुलींना चित्रपटात काम देतो म्हणून आणले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केली जात असल्याचा आरोप राज्य महिला आयोगाने केला. काही व्हिडीओंमध्ये स्वत: खेवलकर दिसत असल्याचा दावा महिला आयोगाने केला. आता त्या आरोपांनंतर महिलांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस अजून कोणते गुन्हे खेवलकर दाखल करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.