
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत शिवसेना शिंदे गट
नातेपुते:राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी होऊ घातलेल्या निवडणूका बाबत शिवसेना उपनेते माजी आमदार शहाजी बापू पाटील, संर्पक प्रमुख महेश साठे,जिल्हाप्रमुख प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नातेपुते येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीस माळशिरस तालुक्यातील फडतरी चे राम रुपनवर, लक्ष्मण रुपनवर,कोळेगावचे प्रा.शहाजी पारसे, बांगर्डेचे रासप चे माजी तालुका उपाध्यक्ष मारुती मेटकरी,माजी सैनिक दादा केंगार, राजाभाऊ देवकते यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकी दरम्यान पदाधिकारी यांच्या अडीअडचणी जाणून घेत आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही निवडक उमेदवारांची देखील चाचपणी करण्यात आली.माळशिरस तालुक्यात शिवसेना पक्ष लवकरच आपली राजकीय ताकद उभारून शिवसेना मतदारांची संख्याबळ वाढवून येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्याचे आदेश देण्यात आले, असून त्या पद्धतीने काम करण्याचे सूचना सतीश सपकाळ यांनी दिल्या आहेत. जो पक्ष शिवसेना पक्षाला सन्मान जनक वागणूक देणार त्या पक्षासोबत युती करून येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे प्रतिपादन तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी केले. यावेळी शिवसेना नेते एकनाथ कर्चे,जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, कार्यप्रमुख महादेव तुपसुंदर,तालुका उपप्रमुख सुनील साठे तानाजी भोळे,कामगार सेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर देशमुख,नातेपुते शहर प्रमुख पै.निखिल पंलगे,जयवंत सपकाळ, अनिल दडस,रावसाहेब कोकाटे,संजय साठे,शिवाजी नाईकनवरे,सोमनाथ वाघमारे,प्रा.दिंगबर साठे,फ्रफुल गायकवाड,संजय दणाणे,शिवराज पलंगे, सह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.