
कुठे कुठे थांबेल; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजूर साहिब नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
पूर्वी ही ट्रेन जालनापर्यंत धावत होती. परंतु आता या ट्रेनची मराठवाड्यातील आणखी दोन जिल्ह्यांना वंदे भारतची कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. यामुळे परभणी आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांकडून आनंद व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील राज्य सचिवालयातून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि नांदेड रेल्वे स्थानकावर एक औपचारिक समारंभ पार पडला. या वंदे भारतमुळे नांदेड आणि राज्याची राजधानी मुंबईच्या आणखी जवळ आले आहे. यामुळे या प्रदेशासाठी समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
नांदेड ते मुंबई प्रवास किती वेळेत पूर्ण होणार?
नांदेड ते मुंबई दरम्यान 610 किलोमीटरचे अंतर वंदे भारत एक्सप्रेस केवळ 9 तास 30 मिनिटांत पूर्ण करेल. यापूर्वी मुंबई आणि नांदेडदरम्यान सर्वात जलद धावणारी देवगिरी एक्सप्रेस हाच प्रवास 11 तास 20 मिनिटांत पूर्ण करत होती. आता वंदे भारतमुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे दोन तासांची बचत होणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून बुधवारी आणि मुंबईहून गुरुवारी ही सेवा उपलब्ध नसेल.
नांदेड-मुंबई वंदेभारत एक्सप्रेसचं वेळापत्रक
नांदेड-मुंबई वंदेभारत (ट्रेन क्रमांक 20705) सकाळी 5:00 वाजता हुजूर साहिब नांदेडहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2:25 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल. तसेच मुंबईहून (ट्रेन क्रमांक 20706) ही ट्रेन दुपारी 1:10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:50 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.
कोणत्या स्थानकांवर थांबेल?
नांदेड ते मुंबईच्या या प्रवासात ही वंदे भारत एक्सप्रेस आठ स्थानकांवर थांबेल. यामध्ये परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकांचा समावेश आहे. या ट्रेनच्या मार्गात नांदेड येथील प्रसिद्ध हुजूर साहिब, शिर्डी, अंजिठा, वेरूळ, नाशिक पर्यटन आणि तीर्थस्थळं जोडली जाणार आहेत. त्यामुळे ही रेल्वे रोजच्या प्रवाशांसोबतच भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.
नांदेड-मुंबई वंदेभारतचे तिकीट दर
नांदेड-मुंबई वंदेभारत एक्सप्रेसमध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअर कार असे दोन प्रकारचे डबे असतील. यातील एसी चेअर कारचे नांदेड ते मुंबईसाठी प्रति व्यक्ती तिकीट 1,610 रुपये असेल, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे नांदेड ते मुंबईसाठी प्रति व्यक्ती तिकीट 2,930 रुपये असेल.
मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT): दुपारी 1:10 वाजता सुटेल
दादर: दुपारी 1:17 वाजता येईल, 1:19 वाजता सुटेल
ठाणे: दुपारी 1:40 वाजता येईल, 1:42 वाजता सुटेल
कल्याण: दुपारी 2:04 वाजता येईल, 2:06 वाजता सुटेल
नाशिक रोड: दुपारी 4:18 वाजता येईल, 4:20 वाजता सुटेल
मनमाड जंक्शन: सायंकाळी 5:18 वाजता येईल, 5:20 वाजता सुटेल
अंकाई: सायंकाळी 5:50 वाजता येईल
छत्रपती संभाजीनगर: सायंकाळी 7:05 वाजता येईल, 7:10 वाजता सुटेल
जालना: रात्री 8:05 वाजता येईल, 8:07 वाजता सुटेल
परभणी: रात्री 9:43 वाजता येईल, 9:45 वाजता सुटेल
हुजूर साहिब नांदेड: रात्री 11:50 वाजता पोहोचेल
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
हुजूर साहिब नांदेड: पहाटे 5:00 वाजता सुटेल
परभणी: पहाटे 5:40 वाजता येईल, 5:42 वाजता सुटेल
जालना: सकाळी 7:20 वाजता येईल, 7:22 वाजता सुटेल
छत्रपती संभाजीनगर: सकाळी 8:13 वाजता येईल, 8:15 वाजता सुटेल
अंकाई: सकाळी 9:40 वाजता येईल
मनमाड जंक्शन: सकाळी 9:58 वाजता येईल, 10:03 वाजता सुटेल
नाशिक रोड: सकाळी 11:00 वाजता येईल, 11:02 वाजता सुटेल
कल्याण जंक्शन: दुपारी 1:20 वाजता येईल, 1:22 वाजता सुटेल
ठाणे: दुपारी 1:40 वाजता येईल, 1:42 वाजता सुटेल
दादर: दुपारी 2:08 वाजता येईल, 2:10 वाजता सुटेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT): दुपारी 2:25 वाजता पोहोचेल