
मनोज जरांगे अखेर मुंबईकडे निघाले; सरकारला घामटा फुटणार ?
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय. नांदेडच्या शेलगाव येथील शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सोबत 15 ते 20 दिवस पुरेल एवढे राशन त्यांनी सोबत घेतलं आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार यावेळी मराठा बांधवांनी केला आहे. ग्रामीण भागात ओबीसी समाजाचा सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
ओबीसींचा हाके, वाघमारे आणि गुणरत्न सदावर्तेंवर आरोप
मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असं म्हणत हाके कमिशन साठी हे सगळं करतोय असा आरोप एका ओबीसी बांधवांनी केला आहे. नांदेडच्या शेलगाव येथील मराठा बांधव प्रचंड आक्रमक झाले असून ते अंतरवाली सराटी मार्गे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. हाके, वाघमारे, व गुणरत्न सदावर्ते हे कुत्रे आहेत त्यांना भकू द्या असं म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढाईत सहभाग नोंदवला आहे.
शहागडमध्ये भव्य स्वागताची तयारी
अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते शहागड येथे दाखल होणार आहेत. दरम्यान शहागड मध्ये त्यांच्या स्वागतासाठी मोठा क्रेन उभा करण्यात आला असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. हजारो मराठा बांधव शहागड मध्ये दाखल झाले आहेत यानंतर ते शहागड मधून पैठण आणि पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे कूच
दरम्यान आता हाती आलेल्या अपडेटनुसार, मनोज जरांगे पाटील वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांचा पहिला मुक्काम हा जुन्नर येथे होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही त्यांची मागणी आहे. आता सरकारला खूप वेळ दिला. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांची प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारने मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्या अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आताच लाखोंचा जमाव अंतरवाली सराटीत दिसला. शहागडवरून हा मोर्चा जुन्नरकडे जाणार आहे. पुढे मुंबईत हा मोर्चा दाखल होईल. आता अटीतटीची लढाई होणार आहे. आता आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तर गेल्यावेळीप्रमाणेच यावेळी सुद्धा मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येत आहे.