
टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि भारतावर थेट टॅरिफ लावण्यात आला. या टॅरिफमुळे भारताला मोठा फटका बसला आहे.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावताना कारण दिले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर टॅरिफ लावत आहोत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे नाही तर अजून परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. मात्र, स्वत: रशिया आणि चीनवर 50 टक्के टॅरिफ लावला नाही.
आता भारत आणि काही देश अमेरिकेच्या विरोधात एकत्र येताना दिसत आहेत. चीनने अगोदरच अमेरिकेवर टॅरिफच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केलीये. तर दुसरीकडे रशिया, ब्राझील आणि जपान देखील भारताच्या बाजूने उभे आहेत. चीन, भारत आणि रशिया आता अमेरिकेला कोंडीत पकडण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष
व्लादिमिर पुतिन हे दोघे लवकरच चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अमेरिकेच्या विरोधात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन आणि जिनपिंग हे एकत्र येणार असल्याने अमेरिकेचा चांगलाच जळफळाट उठल्याचे बघायला मिळतंय. हे तीन बलाढ्य देश एकत्र येत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. एकीकडे भारतावर 50 टक्के टॅरिफ लावणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा आता बदलली आहे.
भारत, रशिया आणि चीन हे एकत्र येऊन बैठक घेत असल्याने डोनाल्ड ट्रम्प हे आता चक्क नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी हे एक अद्भुत व्यक्ती आहेत, असे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक काैतुक करताना दिसत आहेत. हेच नाही तर एका रिपोर्टनुसाप, डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. मात्र, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फोनकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्यामध्ये संवाद हा होऊ शकला नाही.