
गणेशोत्सवामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये येण्यासाठी प्रतिबंध घातला होता. मात्र आज (27 ऑगस्ट) सकाळी सर्व विरोध झुगारून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
यानंतर मनोज जरांगे यांना आझाद मैदानावरील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी अटीशर्तींसह परवानगी दिली आहे. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळताच मनोज जरांगे यांनी स्वत:च्या सहीने मुंबई पोलिसांना 20 आश्वासनासह हमीपत्र दिलं आहे.