
ट्रम्पच्या मंत्र्याची लाईव्ह शोमध्ये बोबडी वळली !
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ दबाव पाहून अनेक देशांनी अमेरिकेकडे पाठ फिरवली आहे. बुधवारपासून भारतीय वस्तूंवर अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ लादला गेला आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंच्या किमती वाढणार आहे.
त्यामुळे आपसूक मागणीत घट होणार आहे. असं असताना दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. आता भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. जयशंकर यांच्या विधानाची दखल अमेरिकन मीडियाने घेतली आहे. जयशंकर यांच्या परखड विधानामुळे अमेरिकेचेही धाबे दणाणले आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनाही या वक्तव्यानंतर मवाळ भूमिका घेणं भाग पडलं आहे. त्यांनी मीडियातील चर्चेत स्पष्ट केलं की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. शेवटी आपण एकत्र राहू. नेमकं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काय वक्तव्य केलं की, अमेरिका बॅकफूटला येताना दिसत आहे.
एस जयशंकर म्हणाले होते की, जर अमेरिकेला भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं अडचणीचं वाटत असेल. तर त्यांनी भारताकडून रिफाइंड तेल खरेदी करणं थांबवावं. एस जयशंकर यांच्या या वक्तव्याने अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे. त्याचं परखड वक्तव्यानंतर अमेरिकन मीडियात चर्चा फड रंगले आहे. अमेरिकेच्या फॉक्स टीव्ही चॅनेलवरील एका अँकरने अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांना याबाबत विचारलं. जयशंकर यांच्या मुद्द्याला हात घालत अर्थमंत्री बेझंट यांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही देश आहे. तर अमेरिकेची मोठी अर्थव्यवस्था आहे. शेवटी आम्ही एकत्र येऊ.’
अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारताने वर्मावर बोट ठेवल्याचं दिसत आहे. भारतावर दबाव टाकणं परवडणारं नसल्याचं त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत आहे. भारतासोबत अमेरिकेचही मोठं नुकसान होऊ शकतं. दरम्यान, टॅरिफ प्रकरणी भारताने अमेरिकेच्या अटी धुडकावून लावल्या आहेत. इतकंच काय तर भारताने अमेरिकेला पर्याय म्हणून दुसरी बाजारपेठ शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेला भविष्यात मोठा फटका बसू शकतो. आता ट्रम्प टॅरिफ मागे घेतात की आडमुठ्या भूमिकेवर कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.