
डोनाल्ड ट्रम्प सरकारचा नवा इशारा…
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारयुद्ध सुरु असून विनाकारण अमेरिकेने भारताबाबत आकस ठेवत ५० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. यावरही भारत आपली भूमिका घेत नसून नागरिकांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.
तर “आमच्या संयमाला कमजोरी समजू नका” असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प सरकारने नवा इशारा भारताला दिला आहे.
आजपासून अतिरिक्त टॅरीफ भारतावर लागू झाला असून भारताने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आणि अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. ट्रम्पंनी इशारा दिला होता की, २८ ऑगस्टपासून भारतावर अतिरिक्त २५ टक्के आणि आधीचे लावलेले २५ टक्के असे ५० टक्के आयात शुल्क लागू होईल. त्यानुसार हे आयात शुक्ल लागू झाले आहे. व्हाईट हाऊसने कालच यासंदर्भात अधिसूचना काढली होती.
अमेरिकेचा नवा इशारा
आता उभय देशांच्या आर्थिक ताणादरम्यान अमेरिकी राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे निदेशक केविन हॅसेट यांनी इशारा दिला आहे. जर भारत मागे हटायला तयार नाही झाला तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पंही कोणत्याच प्रकारची सवलत देणार नाही. हे वक्तव्य भारतावर ५० टक्के आयात शुल्क लागू झाल्यानंतर आले आहे.
ट्रम्प मागे हटणार नाहीत.. – हॅसेट
डोनाल्ट ट्रम्प यांचे आघाडीचे सल्लागार हॅसेट यांनी बुधवारी म्हटले की, भारताच्या व्यापारविषयक धोरणावर म्हटले की, भारतावर आयातशुल्क दुप्पट लागू झाले आहे. भारत जर मागे हटला नाही तर राष्ट्रपती ट्रम्पही मागे हटणार नाहीत.
भारतावर आयडीयल भूमिकेचा आरोप
व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना, हॅसेटने भारतावर अमेरिकन उत्पादनांसाठी बाजारपेठा उघडण्यात “हट्टी” असल्याचा आरोप केला आणि जर नवी दिल्लीने माघार घेण्यास नकार दिला तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांची भूमिका आणखी कठोर करू शकतात असे सुचवले.
भारत अमेरिकेचे संबंध कठीण
हॅसेट म्हणाले, ‘मला वाटते की हे एक कठीण संबंध आहे,’ तो पुढे म्हणाला, ‘याचे एक कारण म्हणजे शांतता करार करण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण रशियावर टाकत असलेला दबाव. आणि मग आमच्या उत्पादनांसाठी बाजारपेठा उघडण्यात भारताचा आयडीयल भूमिका आहे.
काय आहे इशारा
हॅसेट यांनी भारताला इशारा देताना सांगितले की, आमच्या संयमाला कमकुवतपणा समजू नका. वाटाघाटी या एक दीर्घ प्रक्रिया आहे. ते म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही व्यापार वाटाघाटी पाहता तेव्हा आपण सर्वांनी एक धडा शिकलो आहोत की तुम्ही तुमचे लक्ष दीर्घ पल्ल्याच्या विचारसरणीवर ठेवले पाहिजे आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी चढ-उतार येतील हे समजून घेतले पाहिजे.