
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलकांनी सहभाग नोंदवला.
त्यानंतर अखेर राज्य सरकारने जवळपास सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.
मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ओबीसीचे आरक्षण संपल्याची भावना हाकेंकडून व्यक्त करण्यात आली होती. तर आम्हाला वाटेकरू नको आहेत, आम्ही कोर्टात जाणार आहे, अशी थेट भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणेही टाळलं होतं. ओबीसीकडून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. ओबीसीचा हा रोष पाहता राज्य सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा शब्द दिला होता.
Mumbai मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर अखेर राज्य सरकारने जवळपास सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.