
मोठा खुलासा; राष्ट्राध्यक्षांनी सांगितले…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनमधील संमेलनात भेट झाली. फक्त भेटच नाही तर नरेंद्र मोदी आणि पुतिन या दोघांनी एकाच कारमधून प्रवास केला. चीनमध्ये बैठकीला निघाल्यावर पुतिन आणि नरेंद्र मोदी एकाच कारमध्ये बसले.
यादरम्यान ते 45 मिनिट फक्त दोघेच होते. नरेंद्र मोदी यांची काही वेळ वाट पाहत पुतिन थांबले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्यासोबतच्या कार प्रवासाचा फोटो हा थेट सोशल मीडियावर शेअर केला. आता यादरम्यानच्या प्रवासामध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावर थेट पुतिन यांनी खुलासा केलाय.
व्लादिमीर पुतिन यांना पत्रकारांनी विचारले की, नरेंद्र मोदी आणि तुम्ही दोघे एकाच कारमध्ये प्रवास करताना दिसले. तुमच्या दोघांमध्ये 45 मिनिट काय चर्चा झाली? यावर पुतिन यांनी म्हटले की, हे काही फार गुप्त नाही. ज्यावेळी आम्ही दोघे गाडीमध्ये होतो, त्यावेळी मी त्यांना अलास्कामधील बैठकीत काय झाले, यावर बोललो आणि आम्ही दोघांनी त्यावरच चर्चा केली. पुतिन हे या 45 मिनिटांमध्ये दोघांमध्ये काय संवाद झाला हे सांगताना दिसले आहेत.
पुतिन यांनी अलास्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती, त्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर पुतिन यांनी लगेचच नरेंद्र मोदी यांना देखील त्यावेळी फोन केला होता. यावेळी त्यांनी बैठकीत काय झाले हे सांगितले होते. युक्रेन युद्धाबाबत पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प हे जगाला दाखवत आहेत.
अमेरिकेकडून भारताला धमकावले जात असताना पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट शिष्टाचार शिकवला आहे. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणे पूर्णपणे बंद केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना तब्बल चार फोन केले. मात्र, एकाही फोनचे उत्तर हे नरेंद्र मोदी यांनी दिली नाही. अनेक वर्षांचे चांगले संबंध भारत आणि अमेरिकेतील सध्या ताणले गेले आहेत.