
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा; आता अमेरिका..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाकडून भारताबद्दल आग ओकली जात आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला असून पुढील काळात अजून टॅरिफ लावण्याच्या आणि निर्बंधाच्या धमक्या दिल्या जात आहेत.
आता थेट ट्रम्प प्रशासनाची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेत इतके संबंध ताणल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर व्यापार चर्चा थांबलीये. हेच नाही तर भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनही टीका होत आहे.
बायडेन प्रशासनाचे माजी अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आणि उपविदेश सचिव कर्ट एम. कॅंपबेल यांनी थेट इशारा देत भारत आणि चीनची वाढती जवळीकता किती जास्त धोकादायक आहे हे सांगितले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, भारताची तुलना पाकिस्तानसोबत केली नाही पाहिजे, कारण अमेरिकेसाठी पाकिस्तानपेक्षा कितीतरी जास्त महत्वाचा भारत आहे.
कॅंपबेल यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेला भारताचे कायमच समर्थन मिळाले आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये खूप चांगले संबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे कायमच त्यांच्या विधानातून साैदेबाजी करतात. त्यांनी पुढे म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील रणनीती एका निर्णयाने व्हायला पाहिजे. पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट भारत हा अमेरिकेसाठी महत्वाचा आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या जवळ जाताना दिसत आहेत. हेच नाही तर भारताला दूर करून ते पाकिस्तानलासोबत घेताना दिसत आहेत.
अमेरिकेच्या भूमीतून भारताला थेट मोठी धमकी देण्यात आली होती. हेच नाही तर पाकिस्तानात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी व्यापार सुरू केल्यानेच डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या बाजूने झुकले आहेत. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात मीच मध्यस्थी केली. मात्र, भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांची कोणत्याही प्रकारची मध्यस्थी नाही तर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी मिळून यामधून मार्गे काढला आहे.