
थेट झटकाच…
अमेरिकेची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली असून ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे तर देशात रोषाचं वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याही देशातून विरोध होत असून अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
भारताने अमेरिकेसमोर न झुकण्याचा निर्णय घेतला असला तरीही ट्रम्प काही हट्ट सोडायाल तयार नसून त्यांनी भारतावरील 50 टक्के टॅरिफचाी निर्णय अद्याप कायम ठेवला आहे. या मुद्यावरून ते रोज काही ना काही बरळत असतानाच भारताने मात्र आता त्यांच्याकडे लक्ष न देता एका मोठी खेळी केली आहे. टॅरिफच्या मुद्यावरून अमेरिकेशी वाद सुरू असतानाच भारताने इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत. त्याची एक झलक SCO Summit मध्येही पहायला मिळाली. मोदी,शी जिनपिंग आणि पुतीन यांची भेट, हास्यविनोद पाहून ट्रम्प यांचा जळफळाट झाला.
भारताची मोठी खेळी
त्यातच कहर म्हणजे टॅरिफच्या मुद्यावरून ट्रम्प यांचे थैमान सुरू असतानाच आता भारताने मोठी खेळी करत महत्वाचा निर्णय घेतला. भारताने सिंगापूरसोबत अनेक महत्वाच्या डील्सवर, करांरावर स्वाक्षरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग या दोघांची गुरुवारी (4 सप्टेंबर 2025) नवी दिल्लीत भेट झाली. यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे 5 करार झाले. ग्रीन शिपिंगपासून ते स्पेसपर्यंत, भारत आणि सिंगापूर एकत्रितपणे येत्या काही वर्षांत आशिया-पॅसिफिक प्रदेशाच्या राजकारणाला आणि अर्थव्यवस्थेला नवीन चालना देतील. यामुळे अमेरिकेचे तोंड मात्र पाहण्यासारखे झाले असून त्यांच्यासाठीही मोठी चपराक ठरू शकते.
‘सिंगापूर हा आमच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ही केवळ आर्थिक भागीदारी नाही तर सामायिक मूल्ये आणि विश्वासावर आधारित एक खोल मैत्री आहे.’ असे वोंग यांच्यासोबत माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले. अनिश्चिततेने भरलेल्या आजच्या जगात, भारत-सिंगापूर भागीदारी पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे, याचा पुनरुच्चार वोंग यांनी केला.
दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे बांधलेल्या इंडिया मुंबई कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. सिंगापूरच्या पीएसए इंटरनॅशनलने त्यात एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.
5 मोठे करार म्हणजे भविष्याचा रोडमॅप
डिजिटल ॲसेट इनोव्हेशन – आरबीआय आणि सिंगापूरच्या मॉनेटरी ॲथॉरिटीमधील करार. क्रॉस-बॉर्डर पेमेंट आणि डिजिटल चॅनेल मजबूत केले जातील.
एव्हिएशन ट्रेनिंग आणि रिसर्च – एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि सिंगापूरची सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी हे विमान वाहतूक क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी एकत्र काम करतील.
ग्रीन अँड डिजिटल शिपिंग कॉरिडॉर – दोन्ही देश संयुक्तपणे शिपिंग क्षेत्रात शून्य-उत्सर्जन इंधन आणि स्मार्ट पोर्ट तंत्रज्ञानासाठी एक चौकट तयार करतील.
उत्पादनात कौशल्य – चेन्नईमध्ये राष्ट्रीय कौशल्य केंद्राची स्थापना केली जाईल.
स्पेस कोलॅबरेशन – सिंगापूर आणि भारत यांच्यातील अंतराळ उद्योगात सहकार्य वाढेल. आतापर्यंत भारताने सिंगापूरचे सुमारे 20 सॅटेलाइट्स प्रक्षेपित केले आहेत.
भारतासाठी सिंगापूर किती महत्वाचा ?
गेल्या 7 वर्षांपासून सिंगापूर ue भारतातील सर्वात मोठा थेट परदेशी गुंतवणूकदार आहे, दोन्ही देशांमधील एकूण गुंतवणूक सुमारे 170 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2004-05 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 6.7 अब्ज डॉलर्स होता, जो 2024-2025 मध्ये वाढून 35 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. सिंगापूर हा भारताला ASEAN देशांशी जोडणारा पूल आहे. CECA (व्यापक आर्थिक सहकार्य करार) आणि AITIGA (आसियान-भारत वस्तू व्यापार करार) यांचा लवकरच आढावा घेतला जाईल असा निर्णय भारत आणि सिंगापूरने घेतला आहे.