
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जव केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायासोबतच भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे. अग्नी पुराणात अनंत चतुर्दशीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या दिवशी भगवान विष्णूसाठी व्रत ठेवून पूजा-पाठ केल्यास आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि भगवान विष्णू नेहमी कृपा ठेवतात असे म्हटले जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते, या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जनही केले जाते.
यंदा गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते, तर गणपती विसर्जनाच्या दिवशी लोक बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतात. यंदा अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनाला शनिवारचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी भोजनात काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
विशेषतः पांढऱ्या रंगाच्या काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे. कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते. जाणून घेऊया, या दिवशी कोणत्या गोष्टींचे सेवन करु नये…
दही: दही हे पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थांमध्ये गणले जाते. या दिवशी दही खाल्ल्याने व्रताची पवित्रता भंग होते आणि शुभ फल प्राप्त होत नाही.
तांदूळ: तांदूळ हे पांढरे धान्य मानले जाते. व्रताच्या दिवशी त्याचे सेवन करु नये. असे मानले जाते की या दिवशी तांदूळ खाल्ल्याने व्रताचे फळ कमी होते.
मीठ: अनंत चतुर्दशीच्या व्रतात चुकूनही मिठाचे सेवन करू नये, कारण याचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की याचे वाईट परिणाम 14 वर्षे भोगावे लागतात. घरातील सर्व सुख-समृद्धी नष्ट होते आणि राजा रंक बनण्याची वेळ येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)