
अमेरिकन पत्रकाराने काढली डोनाल्ड ट्रम्प यांची इज्जत !
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या परदेशी धोरणावर टीका होत आहे. अशातच आता ज्येष्ठ अमेरिकन पत्रकार रिक सांचेझ यांनीही अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर कडक शब्दात टीका केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोंधळात टाकणाऱ्या आणि विरोधाभासी परराष्ट्र धोरणामुळे अमेरिका आपले धोरणात्मक स्थान गमावत आहे. यामुळे अमेरिकेचे प्रतिस्पर्धी असणारे देश एकत्र येत आहेत असं सांचेझ यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना सांचेझ म्हणाले की, ‘ ट्रम्प कधी प्रेमाने बोलतात, तर कधी आक्रमक भाषा वापरतात. आज ते तुमच्यावर प्रेम करतात असं दिसतं, मात्र दुसऱ्या दिवशी ते तुमचा द्वेश करतात. अमेरिकेची सध्याची धोरणे गोंधळात टाकणारी आहेत. त्यामुळे यावर प्रतिक्रिया द्यायची की दुर्लक्ष करायचे याबाबत अनेक देशांमध्ये संभ्रम आहे. बहुतेक देशांचे राष्ट्रप्रमुख याकडे दुर्लक्ष करतात.
ट्रम्प यांच्याकडून व्यापाराच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन
रिक सांचेझ पुढे बोलताना म्हणाले की, ‘जे खरे व्यापारी असतात त्यांना माहिती असते की बाजारपेठेला कधीही गोंधळात टाकू नये. आपण देत असलेल्या संदेशात स्पष्टता असली पाहिजे. अमेरिका आता असाच गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे अमेरिकेचे पारंपारिक मित्र पर्याय शोधत आहेत. चीन भारताला आकर्षित करत आहे. तो भारताला सांगत आहे की, “मी तुमचा मित्र आहे, आपण व्यापार करू, आम्ही तुमची उत्पादने खरेदी करू, तुम्ही अमेरिकेकडून जी अपेक्षा करत होता ते एकत्र करूया, पण आता अमेरिकेवर विश्वास ठेवू नका.”‘
अमेरिका आता जगातील शक्तिशाली देश नाही – सांचेझ
रिक सांचेझ यांनी म्हटले की, ‘अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश नाही. इस्रायल हा सर्वात शक्तिशाली देश आहे आणि तो अमेरिकेवर नियंत्रण ठेवत आहे. जेव्हा इस्रायल भुंकायला सांगतो तेव्हा अमेरिका भुंकते. जागतिक व्यवस्थेत अमेरिकेची ही भूमिका ट्रम्पच्या समर्थकांनाही पटत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) मोहिमेला पाठिंबा देणारे लोक आता विरोधी भूमिका घेत आहेत. लोक म्हणतात की ट्रम्प म्हणाले होते की मी अमेरिकेला प्राधान्य देईल, पण तुम्ही इस्रायलला प्राधान्य देत आहात.