
बाबा वेंगा ज्यांचं खरं नाव वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा होतं, मात्र त्यांना सर्वत्र बाबा वेंगा याच नावानं ओळखलं जातं. बाबा वेंगा या आपल्या भविष्यवाणीसाठी जगप्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये असे अनेक भाकीतं केले जे खरे ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो.
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकीतांमध्ये अमेरिकेवर झालेला 9/11 चा हल्ला, जगावर आलेलं कोरोना संकट, जपानमध्ये 2004 साली आलेली त्सुनामी, हिटलरचा मृत्यू अशी अनेक भाकीत खरी ठरल्याचं बोललं जातं. दरम्यान 2025 संदर्भात बाबा वेंगा यांनी काही महाभंयकर भाकीतं केली आहेत, त्यातीत अनेक भाकीत आता खरी होताना दिसत आहेत.
काय आहे बाबा वेंगा यांचं भाकीत?
2025 ही जगाच्या अंतराची सुरुवात असेल असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं आहे, 2025 या वर्षात जगावर महाभयंकर अशी संकट येतील, मोठ्या प्रमाणात नौसर्गिक आपत्ती येतील ज्यामध्ये दुष्काळ, महापूर, भूकंप अशा संकटांचा समावेश असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. बाबा वेंगा यांचं हे भाकीत खर ठरलं आहे, नुकताच अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप आला, ज्यामध्ये 500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी म्यानमारमध्ये देखील शक्तिशाली भूकंप झाला होता, यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान 2025 च्या शेवटी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्वालामुखीचा स्फोट होईल असं भाकीत देखील बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.
दरम्यान 2025 च्या शेवटी भारतावर महापुरासारखं एखादं संकट निर्माण होऊ शकतं, असं भाकीत देखील बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे. बाबा वेंगा यांचं हे भाकीत आता खरं होताना दिसत आहे. यावर्षी भारताच्या काही भागांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळे पुराचा मोठा फटका बसला आहे. पंजाबमध्ये मोठा पूर आला आहे, गेल्या दशकभरात असा पूर आला नव्हता, या पुरामध्ये पंजाबचं मोठं नुकसान झालं आहे. बाबा वेंगा यांनी भारतासोबतच पाकिस्तान आणि अमेरिकेबाबत देखील असंच भाकीत वर्तवलं आहे. या देशांमध्ये2025 मध्ये महापूर येईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)