
किंमत ऐकून तोंडं बंद…
आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून अवघ्या काही तासात स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या जेतेपदासाठी कंबर कसली असून सराव सुरु केला आहे. मात्र या सरावादरम्यान हार्दिक पांड्याच्या घड्याळाची चर्चा रंगली आहे.
त्याची किंमत वाचून अनेकांचे डोळे फिरले आहेत.
हार्दिक पांड्याने रिचर्ड मिल आरएम 27-04 हे घड्याळ मनगटावर घातलं होतं. रिपोर्टनुसार, या घड्याळाची बाजारभाव किंमत 20 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आशिया कपसाठी निवडलेल्या पाकिस्तानी संघाचा तिळपापड झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे.
आशिया कपसाठी पाकिस्तानने 17 खेळाडूंचा चमू निवडला आहे. यापैकी 7 खेळाडू हे ब श्रेणीत आहेत. या खेळाडूंचा वार्षिक पगार हा 1कोटी 69 लाख 2 हजार 540 रुपये आहे. त्याची वार्षिक बेरीज केली तर 11 कोटी 83 लाख 17 हजार 780 रुपये होते.
पाकिस्तानचे पाच खेळाडू हे सी ग्रेडमध्ये येतात. प्रत्येक खेळाडूचं वार्षिक वेतन हे न 93 लाख 90 हजार 300 रुपये आहे. पाच खेळाडूंची एकूण बेरीज केली तर 4 कोटी 69 लाख 51 हजार 500 रुपये आहे.
उरलेले पाच खेळाडू हे डी ग्रेडमध्ये मोडतात. त्यामुळे दरवर्षी त्यांना पगार 56 लाख 34 हजार 180 रुपये मिळतो. या पाच खेळाडूंची वार्षिक बेरीज केली तर 2 कोटी 70 हजार 900 रुपये येते.
आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या 17 खेळाडूंची एकूण वार्षिक रक्कमेची बेरीज हेी 19.34 कोटी रुपये येते. हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत 20 कोटी रुपये आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 कन्नडवरून)