
धक्कादायक रिपोर्ट पुढे; टॅरिफ लावून…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या माध्यमातून भारतासह अनेक देशांना धमकावताना दिसत आहेत. मात्र, एकीकडे मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात असतानाच ट्रम्प कुटुंबिय मालामाल होताना दिसत आहेत.
नुकताच ट्रम्प कुटुंबियांच्या मागील काही महिन्यातील कमाईचा आकडा हा चक्रावणारा आहे. रिपोर्टनुसार, ट्रम्प कुटुंबाने काही आठवड्यातच तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
ट्रम्प कुटुंबियांची सर्वात खास बाब म्हणजे हा व्यवसाय सुरू करून त्यांनी एक वर्षाचा कालावधी देखील झाला नाहीये. त्यामध्येच त्यांनी इतकी मोठी कमाई केलीये.ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाने काही आठवड्यामध्येच दोन क्रिप्टो फर्म्सद्वारे तब्बल $1.3 अब्ज कमावले आहेत आणि हा आकडा अत्यंत मोठा आहे. भारतीय रूपयांमध्ये 11451 कोटी ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी काही आठवड्यात कमावले आहेत.
वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल आणि अमेरिकन बिटकॉइन कॉर्प यांच्यातून त्यांनी ही कमाई केली. अमेरिकन बिटकॉइन मार्च 2025 मध्ये लाँच झाले. त्याला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत इतकी कमाई डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी केलीये. ट्रम्प यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती आता सुमारे $7.7 अब्ज म्हणजेच भारतीय रूपयांप्रमाणे 67,808 पेक्षाही जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा एरिक ट्रम्प हा ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुटुंबाच्या क्रिप्टो पोर्टफोलिओचे प्रमुख आहे.
क्रिप्टोमधून डोनाल्ड ट्रम्प यांचे कुटुंबिय चांगलाच पैसा कमवत असल्याचे स्पष्ट होतंय. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मागणीवरून जगाला वैठीस धरताना दिसत आहेत. हेच नाही तर अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलताना दिसत आहेत. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे कुटुंबिय फक्त क्रिप्टोच नाही तर पाकिस्तानमधूनही मोठा पैसा कमावत आहेत. पाकिस्तानमध्येही ट्रम्प कुटुंबियांनी मोठी गुंतवणूक केलीये. यामुळे पाकिस्तानला हाताला धरून चालताना ट्रम्प दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच मोठी मदत ही पाठवली. ज्यामध्ये जीवन उपयोगी साहित्य होते.