
मुंबईत एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. मुंबईतील कुलाबा येथे एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या जवानाची रायफल आणि काडतुसे थेट पळून नेली. 6 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. या घटनेने आता मुंबईत थेट अलर्ट जारी करण्यात आलाय.
यंत्रणा सर्तक झाल्या असल्याचे बघायला मिळतंय. ATS हायअलर्ट मोडवर असून तपास केला जातोय. भारतीय नौदलाचा गणवेश घातलेल्या एका व्यक्तीने नेव्ही नगरच्या भागात ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीरला फसवले. त्याने चक्क अग्निवीरचे रायफल आण काडतुसे पळवली.
मिळालेली अधिक माहिती अशी की, नेव्हीच्या गणवेशात आलेल्या व्यक्तीने ड्युटीवर असलेल्या अग्निवीरला सांगितले की, तुझी ड्युटी संपली आहे. तू आराम कर. त्याने अग्निवीरच्या हातातील रायफल घेतली. अग्निवीरला त्या व्यक्तीची ओळख नव्हती. त्याला वाटले की, हा नेव्हीतील नवीन अधिकारी आहे, तो नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात असल्याने त्याला अजिबातच संशय आला नाही. मात्र, रायफल घेऊन काही वेळातच या व्यक्तीने पळ काढला.
काही वेळातच त्या अग्निवीरला समजले की, तो व्यक्ती नौदल अधिकारी नसून घुसखोर आहे. या घटनेची माहिती लगेचच अधिकाऱ्यांना देण्यात आली. या घटनेमुळे नौदल, एटीएस आणि मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ज्याठिकाणी हा प्रकार घडला, तिथे सर्च मोहिम राबवली गेली. मात्र, अजून तरी काही माहिती या प्रकरणात मिळाली नाहीये. मुंबई पोलिस आणि भारतीय नौदल मिळून या प्रकरणात तपास करत आहे. कफ परेड पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेच नाही तर या प्रकरणी चाैकशी करण्यासाठी नौदलाकडून एक समिती तयार करण्यात आलीये. घुसखोर त्या जवानापर्यंत नेमका पोहोचला कसा आणि त्याच्याकडून नौदलातील अधिकाऱ्याचा गणवेश करा आला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रित बाबीनुसार सध्या तपास सुरू असल्याची माहित मिळतंय. मात्र, चक्क नौदल अधिकारी बनून एक व्यक्ती आला आणि त्याने रायफल पळून नेली, याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवल्याचेही माहिती मिळतंय.