
लोकांचे वाढले टेन्शन; अमेरिकेत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरले आहेत. फक्त जगच नाही तर त्यांच्यावर अमेरिकेतूनही टीका होतंय. डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतील हे सांगणे कठीणच आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. त्यांच्या या टॅरिफला जगभरातून विरोध होताना दिसतोय. आता भारतानंतर त्यांच्या निशाण्यावर रशिया आहे. रशियावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प आहेत. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यानेच आपण टॅरिफ लावल्याचे त्यांनी मान्य केले. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर अनेक प्रकारे दबाव टाकत आहेत. नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन उचलणे बंद केले. आता टॅरिफच्या वादात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळालाय.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनबाबतच्या कठोर भूमिकेला पाठिंबा दिला आहे. बहुमताच्या निर्णयात न्यायालयाने लॉस एंजेलिसमध्ये फेडरल एजंट्सना इमिग्रेशन ऑपरेशन्स करण्याचा मार्ग मोकळा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी या निर्णयाशी सार्वजनिकरित्या असहमती दर्शविली आहे. फेडरल न्यायाधीशांच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली.
लॉस एंजेलिसमधील यूएस जिल्हा न्यायाधीश मामे फ्रिमपोंग यांनी 11 जुलै रोजी ट्रम्प प्रशासनाच्या कृतींमुळे अमेरिकन संविधानातील चौथ्या दुरुस्तीअंतर्गत अवास्तव शोध आणि जप्तीपासून संरक्षणाचे उल्लंघन झाले असल्याचे म्हटले होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा विजय मिळाल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसतंय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर असल्याचेही काही दिवसांपूर्वीच कोर्टाने म्हटले होते. तुम्ही अशाप्रकारे निर्णय घेऊ शकत नसल्याचे थेट कोर्टाने म्हटले होते.
शिवाय तुमचा हा टॅरिफ ऑक्टोबरपर्यंत बंद करा, असेही डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प हे आता रशियावर नेमके काय निर्बंध लादतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये रशियाने अजूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि उलट युक्रेनवर हल्ले सुरू ठेवली आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत रशियाल इशारा दिला.