
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):- मुस्लिम धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र समजली जाणाऱ्या हाज – उमरा या यात्रेसाठी मक्का मदिना या पवित्र ठिकाणी इंदापूर शहरातून सामाजिक कार्यकर्ते हमीद नबीलाल आत्तार, सायराबी हमीद आत्तार व त्यांची कन्या सानिया हमीद आत्तार हे मुस्लिम बांधव पवित्र हाज – उमरा यात्रेसाठी मक्का-मदिना येथे रवाना होणार आहेत. यानिमित्ताने इंदापूर वासियांच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
उमराह, ज्याला इस्लाम धर्मात ‘छोटा हज’ असेही संबोधले जाते, ही मक्का येथे केली जाणारी एक महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सुन्नतनुसार केली जाते. उमराहमध्ये विशेष धार्मिक विधींचा समावेश आहे, ज्यामध्ये अहेराम (विशेष कपडे) परिधान करणे, काबा शरीफची सात वेळा परिक्रमा (तवाफ) करणे, नमाज अदा करणे’ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक’ ही प्रार्थना म्हणणे, सफा आणि मरवा या दोन टेकड्यांदरम्यान सात वेळा धावणे आणि केस कापणे यांचा समावेश आहे. या सर्व विधींमुळे उमराहला इस्लाममध्ये विशेष स्थान आहे.
हमीद आत्तार व त्यांच्या पत्नी सायराबी आत्तार यांचे सामाजिक कार्य व लोकसंपर्क यातून ते हाज-उमरा या पवित्र यात्रेस जाणार असे समजल्यानंतर इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता.यामध्ये सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते यावरून त्यांचे सर्वधर्मसमभावाचे कार्य दिसून येते.
यावेळी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे, ॲड.गिरीष शहा,इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा मायाताई विंचू,इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अलका ताटे,महादेव चव्हाण सर, शिवाजी मखरे,अनिल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दगडू सिद, पत्रकार श्रीयश नलवडे,शेटे सर,अविनाश कोथमिरे,शेखर पाटील,गफूर सय्यद, फकीर पठाण, परबत सर, गुंड गुरुजी, संतोष देवकर, संतोष जामदार,हाजी सलीम भाई बागवान,नासिर भाई,सचिन पलंगे,नानासाहेब देवकर,अशोक अनपट, सचिन चौगुले,अशोक पोळ,सिकंदर बागवान,चांद पठाण,अमोल खराडे,अजय बारसे,देवराव मते, हाजी असलम भाई बागवान,मेहबूब मोमीन,सफल घासकाटू अफसर मोमीन,अशोक ननवरे,बहुसंख्य इंदापूरकर नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.