
भारताला उद्ध्वस्त करण्याचा कट; वैज्ञानिकांनी थेट…
डोनाल्ड ट्रम्प हे भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव आणत आहेत. हेच नाही तर भारताने आपले म्हणणे ऐकावे आणि झुकावे, यासाठी ते पाकिस्तानच्या माध्यमातून धमक्या देत आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. हेच नाही तर दोन्ही देशांमधील तणाव इतका जास्त वाढला होता की, कोणत्याही स्थितीमध्ये युद्ध भडकू शकले असते. मात्र, दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेत हे युद्ध थांबवले. मात्र, यादरम्यानच्या काळात भारताने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. भारताची आक्रमकता पाहून पाकिस्तानची इतकी जास्त घाबरगुंडी उडाली की, त्यांनी थेट अमेरिकेकडे देखील मदत मागितली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने दावा केला जातोय की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठे युद्ध थांबवले. मात्र, याला भारताने स्पष्टपणे खोटे असल्याचे म्हटले. आता एक अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसतंय. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. किराना हिल्सबद्दल अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी मोठा खुलासा केला. अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी म्हटले की, भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली.
भारताने पाकिस्तानच्या अकरा एअरबेसला मिसाईलच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले. किराना हिल्सवर देखील मोठा स्फोट झाला. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान स्वत:ला वाचू शकला नाही किंवा भारताला सडेतोड उत्तरही देऊ शकला नाही. अमेरिकेच्या वैज्ञानिकांच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान भारत युद्धामध्ये स्वत:चा बचाव देखील करु शकत नाही, उत्तर देणे तर दूरचीच गोष्ट आहे. मात्र, असे असले तरीही पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरदरम्यान एकदाही आपला पराभव स्वीकारला नाही.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, भारतासोबत झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानने परमाणूवरील काम वाढवले आहे. हेच नाही तर भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि हल्ल्याला जोख उत्तर देण्यासाठी त्यांनी परमाणू कार्यक्रम वाढवण्यावर भर दिलाय या संघर्षातून पाकिस्तानला आपली ताकद कळाली आणि लक्षात आले की, आपण भारतासोबतच्य संघर्षात टिकू शकत नाहीत. दुसरीकडे अमेरिकेला हाताशी धरून पाकिस्तान मोठा गेम करतोय. नुकताच अमेरिकेने पाकिस्तानसोबत मोठा करार केलाय. या काळात रशिया आणि चीन हे भारताच्यासोबत असल्याचे स्पष्ट दिसतंय.