
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन 152 मतांनी विजयी झाले आहेत. इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एनडीएकडून होत आहे.
इंडिया आघाडीची प्रत्यक्षात 315 मते असताना त्यांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली. यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
राहुल गांधी हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपल्यानंतर बुधवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी बिहारमध्ये एका कार्यकर्त्याने केलेल्या विधानावर राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जात होती.