
लवकरच वेतन आयोग स्थापन होणार; दिवाळीत मिळणार गोड बातमी…
केंद्र सरकारच्या कोट्यवधी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आली आहे. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगाशी संबंधित एक आनंदाची बातमी मिळू शकते.
त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखीनच गोड होणार आहे.
कधी होईल आठवा वेतन आयोग?
‘अपस्टाॅक्स’च्या वृत्तानुसार, 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत काम वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत, बातमी समोर आली आहे की, यावर्षी दिवाळीपर्यंत म्हणजेच 22-23 ऑक्टोबरपर्यंत 8 वा वेतन आयोग स्थापन होईल, 8 वा वेतन आयोग स्थापन होण्याची आनंदाची बातमी येऊ शकते.
राज्य सरकारची केंद्र सरकारची चर्चा
यासंदर्भात गुड रिटर्न्सनेही वृत्त दिले आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच काळापासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आता लवकरच याबाबत अपडेट मिळणार आहे. सरकारने म्हटले आहे की सरकार आठव्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत राज्यांशी सतत चर्चा करत आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय महासंघाच्या (GENC) प्रतिनिधी मंडळाने केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या काही प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
८वा वेतन आयोग त्वरित स्थापन करावा.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करावी.
कोविड-१९ महामारीच्या काळात रोखलेल्या १८ महिन्यांच्या महागाई भत्ता (DA) च्या थकबाकीचे त्वरित वाटप करावे.
सरकारने काय दिले आश्वासन?
कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री जितेंद्र सिंह यांनी आश्वासन दिले की ८वा वेतन आयोग लवकरच स्थापन केला जाईल. त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर, विशेषतः पेन्शन संबंधित मुद्द्यांवर, सरकार गांभीर्याने विचार करत आहे आणि लवकरच यावर चर्चा केली जाईल.