
सोन्या-चांदीचे अलंकार; दानपेटी घेऊन चोरटे पसार…
नांदेड : शहरातील जैन मंदिरात १० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराचे गेट तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे देवाचे अलंकार तसेच दानपेटीतील रक्कम असा एकूण अंदाजे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. सात दिवसांत दुसरी चोरीची घटना असल्याने लोहा शहरात भीतीचे वातावरण आहे.