
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी : देवा आत्राम
वणी येथील टिळक चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तरुणांकडून ३.३७ ग्राम मडी ड्रग पावडर, एक रॉयल एनफील्ड बाईक व दोन मोबाइल असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थांची डील होणार असल्याची गोपिनिय माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने कारवाई केली, एका आईस्क्रीम सेंटर व पान टपरीच्या मागे एमडी ड्रग ची डील सुरू असताना पथकाने झडप घेऊन दोघांना ताब्यात घेतले.