
आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पाकिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण पहिल्या चेंडूवर पाकिस्तान बॅकफूटवर गेला.
पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने विकेट काढली. त्यानंतर जसप्रीतबुमराहनेदुसऱ्याषटकातविकेट घेतली आहे. यामुळे पाकिस्तानचा पॉवर प्लेच्या गतीला ब्रेक लागला. मधल्या फळीच्या फलंदाजांना कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी गुंडाळलं. या दोघांनी मिळून 5 गडी बाद केले. यात कुलदीप यादवने 3 आणि अक्षर पटेलने 2 विकेट काढल्या. पाकिस्तानने विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 15.5 षटकात तीन गडी गमवून पूर्ण केलं. यासह भारताने सुपर 4 फेरीत एन्ट्री मारली आहे. या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने भावना व्यक्त केल्या.
सूर्यकुमारयादवलावाढदिवशी विजयाची भेट मिळाली. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘खूप छान भावना आणि भारताला एक परिपूर्ण परतीची भेट. जेव्हा तुम्ही त्याबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या मनात सतत तीभावना धावत राहते. तुम्हाला तो नक्कीच जिंकायचा आहे आणि जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्यासाठी तयार असता. एक बॉक्स ज्यावर मला नेहमीच टिक करायचे असते. खेळपट्टीवर राहा आणि शेवटपर्यंत फलंदाजी करा. आम्हाला वाटते की हा फक्त दुसरा सामना आहे. आम्ही सर्व विरोधी संघांसाठी अशीच तयारी करतो. काही महिन्यांपूर्वी असेच घडले होते. सीटीजिंकणाऱ्या संघाने सूर लावला. मी नेहमीच फिरकीपटूंचा चाहता आहे कारण ते मध्यभागी खेळ नियंत्रित करतात.‘
दरम्यान सूर्यकुमारयादवनेपहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत भारतीयांचं मन जिंकलं. ‘आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही आमची एकता व्यक्त करतो. हा विजय आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो ज्यांनी खूप शौर्य दाखवले. आशा आहे की ते आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहतील. जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांना आनंद देण्याची संधी मिळेल तेव्हा आम्ही त्यांना मैदानावर अधिक देऊ.‘ भारतीय कर्णधाराने प्रतिक्रिया दिल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला बोलण्याची संधी दिली नाही.