
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपू्र्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरूच आहे. अशामध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि २० सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर आणि धारशिवमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये २० सरपंच आणि काही उपसरपंच, माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर धाराशिवमधील देखील अनेक पादिकाऱ्यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.