
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी -प्रा.विजय गेंड
श्रीपूर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रिया पार पडली त्यामध्ये श्रीपूर शहर चे नुतन पदाधिकारी म्हणून शहर सरचिटणीस संजय खरे श्रीपुर शहराचे नूतन कार्याध्यक्ष महेश रणपिसे तसेच खजिनदार रमेश भोसले यांची निवड झाली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सोलापूर येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून पक्षहितासाठी काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, श्रीपूर शहर अध्यक्ष गणेश सावंत, संजय भोसले सर, सुभाष सरवदे, कुमार शिंदे, शिवाजी काटे उपस्थित होते यावेळी शासकीय सेवेत रुजू झालेले विश्वजीत भालशंकर यांचाही सत्कार राजाभाऊ सरवदे यांनी करुन सर्वांनी पुढील कार्यासाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.