भाजपने मागील तीन वर्षांपूर्वीच ऑपरेशन लोटसला सुरुवात केली होती. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा पक्ष, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम केले. आता दुसऱ्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपामध्ये ओढले जात आहे.
शेवटी या दोन्ही पक्षांत कोणीच शिल्ल्क राहणार नसल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची घरवापसी होण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी केला.
पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. फेक आधारकार्डबाबत पुरावे सादर केल्यानंतरही भाजपने वेळकाढूपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, आज राज्य निवडणूक आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधला आहे. मतचोरी समोर येऊनही आता मतदानावेळी व्हीव्हीपॅट काढण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाची नोंदणी योग्य पद्धतीने होत नाही, तोपर्यंत मतदानात सहभागी होऊ नये, अशी भूमिका मी विषद करणार आहे. अर्थात याबाबत मविआतील नेतेमंडळी निर्णय घेतील.
